रहिमतपूर...म्हणजे काय?



काय सांगू माझ्या गावाची माहिती?
माहिती पेक्षा महती फार मोठी आहे.

रहिमतपूरचे पाणी काही औरच आहे, भाऊ...आहात कुठे...
रहिमतपूर म्हणजे...

कवि गिरिश यांच्या कवितेची दरवळ...
चौकातल्या मारूतीचा किर्तन सोहळा...
कोजागिरीची धुंद रात्र सरता सरता फुलपाखरू झालेले मन...
माळावर हुकलेले क्रिकेटचे शॉटस...
आषाढीला केलेला विठ्ठल रखुमाईचा गजर...
चौंडेश्वरी पुढे फोफाट्यात बसून खाल्लेला भंडाय्राचा प्रसाद...
बैलगाड्यांच्या शर्यतीवेळी मारलेल्या शिट्ट्या, ठोकलेल्या आरोळ्या...
राम जन्मावेळी खाल्लेला सुंठवडा...
जैन मंदिरात चोरून केलेला प्रवेश...
आणि पकडल्यावर खाल्लेला मार...
उन्हाळा-दिवाळीत रोज रात्री 'प्रभात' मधे पाहिलेला सिनेमा...
रोज सकाळी न चुकता भेटावेसे वाटणारे 'हिन्द्-वाचनालय्'...
संध्याकाळी जोतिबाच्या माळावर मारलेला फेरफटका...
स्वातंत्र्यदिनाला गांधी चौकात पावसात भिजत खेळ्लेला लेझीम...
चंद्रागिरी वर काढलेली सहल...
ब्रम्हपुरीच्या यात्रेला जाताना वाटेत पाडलेल्या चिंचा...
चोरून खाल्लेल्या काकड्या, कलिंगडे...
आणि बरेच काही......

Comments

Popular posts from this blog

हिरा......

पाऊस काय म्हणतोय्...