आनंद दिपोत्सवाचा...
कोजागिरीची मौज न्यारी...बेधुन्द होई दुनिया सारी...
सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा एक आगळी वेग़ळी कोज़ागिरी अनुभवायला मिळाली. यावर्षी गर्दीचा उच्चांक गाठला गेला.
'अर्थशून्य वाटे मज हा कलह जीवनाचा' विसरलो. तसा उशीराच पोचलो त्या रात्री, पण रात्रीचा दिवस झालेला पाहिला.
हत्तीने सोंड उंचावून स्वागत केले. मोरांग्यांनी आपल्या नृत्यचापल्ल्याने दिलखुश करुन टाकले. 'आम्ही आनंदयात्री' च्या वाद्यवृंदाने प्रवासाचा शिणवटा पळवून लावला. कठपुतलीचा 'हा खेळ बाहुल्यांचा' पाहून पोट फाटेपर्यंत हसलो. 'जनार्दन सोंगी व भारुड मंडळाच्या' चावट चिमट्यांना शिट्ट्या मारून दाद दिली. झांझ पथकाच्या ठेक्यावर झिंग येयीतोवर नाचलो. भजनाच्या भजनी लागून भक़्तिरसात रममाण झालो.
रोकडेश्वरापुढे नतमस्तक झालो. मधेच रजतदुग्धाचा रसास्वाद घेतला. 'ज्ञानवर्धिनी'च्या रांगोळ्या डोळ्यात साठवून घेतल्या. पहाटे कधीतरी निद्रेने पाश टाकले.
पण धुंदी अजुनही उतरली नाही...माझी आणि जमलेल्या सर्वांचीच...
Comments