Posts

हिरा......

Image
माझ्या गांवातील लोकांना हे नांव नवीन नाही. मी पाहिलेल्या अनेक व्यक्तींपैकी हा एक...जगावेगळा. हिरा ...सध्या काय करतो माहित नाही. त्यावेळी म्हणजे दहा वर्षांपूर्वी तो जेमतेम चाळीशीचा असावा पण सारं गांव त्याला एकेरी नावानं हाक मारायचं कारण तो कुणालाच कधी परका वाटला नाही. हिरा आठवला कि गावातील प्रत्येकाला स्वत:चं बालपण आठवतं. सातारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असणारं माझं गांव. गावातल्या गल्ली बोळातून नगरपालिकेचा गाडा ओढत, कचरा गोळा करत गावाची स्वच्छता करणारा एक सफाई कामगार...एक अवलिया...हिरा. "हिरा आठवतोय का?" म्हणताक्षणी माझ्यासारख्या बय्राच जणांना त्याचं मूर्त स्वरूप नजरेसमोर येतं. उंचीने बुटकासा,काळा-सावळा वर्ण,जाड मिशांचे आकडे वळवलेले,डोक्यावर कसातरी बांधलेला फेटा. कायम एकच पोशाख.अंगात बंडी, बंडीवर घातलेले काळ्या रंगाचे हाफ जॅकेट. खाली कळकटलेले धोतर ज्याला पांढरा रंग होता असे सांगावे लागेल. असलीच तर पायात चप्पल. कचय्रात सापडलेले वेगवेगळे मणी एकत्र ओवून त्यांची गळ्यात घातलेली माळ. त्या माळेच्या मध्यभागी ओवलेला एक दात. पाचही बोटात वेगवेगळ

बालपणीचा उन्हाळा...

सकाळी ऊन्हे डोळ्यावर येयीपर्यंत काढलेली झोप... विहिरीवर जाऊन मनसोक्त पोहण्याचा घेतलेला आनंद... पोहून येताना खाल्लेले पाडाचे आंबे... कडक ऊन्हात मार्केट यार्डवर क्रिकेट्च्या मॅचेस्... संध्याकाळी चौकातल्या मारुतीच्या कट्ट्यावर बसलेला अड्डा...पिच्चरचे प्लॅन्स... रात्री अंगणात ओळीने टाकलेली अंथरूणे...रंगलेल्या गप्पा...यात्रा... देवाला पोळ्यांचा नैवेद्य... छबिन्याच्या रात्री काढलेली सोंगे...पालखीवर उधळलेला गुलालाचा रंग... पहाटे तारवटल्या डोळ्यांनी पाहीलेला तमाशा... मामाकडून खाऊसाठी मिळालेले पैसे... त्यातून घेतलेली गारीगार,कलिंगडे,काकड्या... जत्रेत वाजवलेल्या पत्र्याच्या शिट्ट्या... दोन्ही काटे एकाच चावीने फिरणारी नकली घड्याळे... एकच काडी वरखाली करुन फोटो दाखवणारा कॅमेरा... पहिल्या ओळीत बसून पाहिलेला दुपारचा तमाशा... चार-चार विजारी घातलेल्या प्रधानाला आसुडाने फोडून काढणारा राजा... शिट्टी न येता सुद्धा तोंडात बोटे घालून केलेले फूफू... नमन,गवळण,वग.....कुस्तीचा फड... बत्ताशावर केलेली पहिली कुस्ती... मातीला पाठ टेकल्यावर डोळ्यात आलेले पाणी... मित्राने दिलेला धीर... पाहुण्यां

रहिमतपूर...म्हणजे काय?

Image
काय सांगू माझ्या गावाची माहिती? माहिती पेक्षा महती फार मोठी आहे. रहिमतपूरचे पाणी काही औरच आहे, भाऊ...आहात कुठे... रहिमतपूर म्हणजे... कवि गिरिश यांच्या कवितेची दरवळ... चौकातल्या मारूतीचा किर्तन सोहळा... कोजागिरीची धुंद रात्र सरता सरता फुलपाखरू झालेले मन... माळावर हुकलेले क्रिकेटचे शॉटस... आषाढीला केलेला विठ्ठल रखुमाईचा गजर... चौंडेश्वरी पुढे फोफाट्यात बसून खाल्लेला भंडाय्राचा प्रसाद... बैलगाड्यांच्या शर्यतीवेळी मारलेल्या शिट्ट्या, ठोकलेल्या आरोळ्या... राम जन्मावेळी खाल्लेला सुंठवडा... जैन मंदिरात चोरून केलेला प्रवेश... आणि पकडल्यावर खाल्लेला मार... उन्हाळा-दिवाळीत रोज रात्री 'प्रभात' मधे पाहिलेला सिनेमा... रोज सकाळी न चुकता भेटावेसे वाटणारे 'हिन्द्-वाचनालय्'... संध्याकाळी जोतिबाच्या माळावर मारलेला फेरफटका... स्वातंत्र्यदिनाला गांधी चौकात पावसात भिजत खेळ्लेला लेझीम... चंद्रागिरी वर काढलेली सहल... ब्रम्हपुरीच्या यात्रेला जाताना वाटेत पाडलेल्या चिंचा... चोरून खाल्लेल्या काकड्या, कलिंगडे... आणि बरेच काही......

आनंद दिपोत्सवाचा...

Image
कोजागिरीची मौज न्यारी...बेधुन्द होई दुनिया सारी... सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा एक आगळी वेग़ळी कोज़ागिरी अनुभवायला मिळाली. यावर्षी गर्दीचा उच्चांक गाठला गेला. 'अर्थशून्य वाटे मज हा कलह जीवनाचा' विसरलो. तसा उशीराच पोचलो त्या रात्री, पण रात्रीचा दिवस झालेला पाहिला. हत्तीने सोंड उंचावून स्वागत केले. मोरांग्यांनी आपल्या नृत्यचापल्ल्याने दिलखुश करुन टाकले. 'आम्ही आनंदयात्री' च्या वाद्यवृंदाने प्रवासाचा शिणवटा पळवून लावला. कठपुतलीचा 'हा खेळ बाहुल्यांचा' पाहून पोट फाटेपर्यंत हसलो. 'जनार्दन सोंगी व भारुड मंडळाच्या' चावट चिमट्यांना शिट्ट्या मारून दाद दिली. झांझ पथकाच्या ठेक्यावर झिंग येयीतोवर नाचलो. भजनाच्या भजनी लागून भक़्तिरसात रममाण झालो. रोकडेश्वरापुढे नतमस्तक झालो. मधेच रजतदुग्धाचा रसास्वाद घेतला. 'ज्ञानवर्धिनी'च्या रांगोळ्या डोळ्यात साठवून घेतल्या. पहाटे कधीतरी निद्रेने पाश टाकले. पण धुंदी अजुनही उतरली नाही...माझी आणि जमलेल्या सर्वांचीच...

पाऊस काय म्हणतोय्...

Image
मित्रा...!!! कंटाळलास का रे रोजच्या रुटिनला? दोन दिवस ऑफिसला दांडी मार. सरळ गावी ये. मी पोचलोय इथे. उतरताच हलक्या सरींनी तुझे स्वागत करीन. चालताना हळू चाल,घसरशील नेहमीसारखा, रस्ते निसरडे झालेत गावचे. स्टँडवर उतरून तसाच चौकात जा. मस्त गरम गरम भजी प्लेट घे,पार्सल! घरी जा. सगळे खुश होतील,दिवस मस्त जाईल तूझा. मी मात्र दिवसभर आनंदात बरसत राहीन. दुसय्रा दिवशी माझा बहर ओसरेल,तू बाहेर पड. रस्त्यात पाणी साचलेल्या डबक्यात एखादी उडी मार,शेजारून जाणाय्राला भिजव. वेडा म्हणतील तूला,पण तू लक्ष देऊ नकोस. गावात फिर, माळावर जा, फुटबॉल खेळ, चिखलात लोळ. रस्त्त्याकडेच्या पाटात हात-पाय धू. दुपारी शेतावर जा. मऊ ढेकळांच्या पायाला गुदगुल्या करून घे. मातीचा सुगंध नाकात भरून घे. कागदाच्या नावा करून पाण्यात सोड. मी येतोच तेवढ्यात! पोत्याची खोळ करुन आंब्याखाली बस. मी थांबत नाही असे दिसताच घरी चालू लाग. घरी शेगडी पेटवून शेंगा,भातवड्या भाज. खाता खाता पत्र्यावर होणारा माझा आवाज कानात साठव. रात्री उबदार गोधडीत झोपी जा. सकाळीच निघ. माझे अश्रू अनावर होतील. तू त्यात मनसोक्त भिजून घे...... फ्