पाऊस काय म्हणतोय्...





मित्रा...!!!
कंटाळलास का रे रोजच्या रुटिनला?
दोन दिवस ऑफिसला दांडी मार. सरळ गावी ये. मी पोचलोय इथे.
उतरताच हलक्या सरींनी तुझे स्वागत करीन. चालताना हळू चाल,घसरशील नेहमीसारखा, रस्ते निसरडे झालेत गावचे.

स्टँडवर उतरून तसाच चौकात जा. मस्त गरम गरम भजी प्लेट घे,पार्सल! घरी जा. सगळे खुश होतील,दिवस मस्त जाईल तूझा.

मी मात्र दिवसभर आनंदात बरसत राहीन.

दुसय्रा दिवशी माझा बहर ओसरेल,तू बाहेर पड. रस्त्यात पाणी साचलेल्या डबक्यात एखादी उडी मार,शेजारून जाणाय्राला भिजव. वेडा म्हणतील तूला,पण तू लक्ष देऊ नकोस. गावात फिर, माळावर जा, फुटबॉल खेळ, चिखलात लोळ. रस्त्त्याकडेच्या पाटात हात-पाय धू.

दुपारी शेतावर जा. मऊ ढेकळांच्या पायाला गुदगुल्या करून घे. मातीचा सुगंध नाकात भरून घे. कागदाच्या नावा करून पाण्यात सोड. मी येतोच तेवढ्यात! पोत्याची खोळ करुन आंब्याखाली बस.

मी थांबत नाही असे दिसताच घरी चालू लाग. घरी शेगडी पेटवून शेंगा,भातवड्या भाज. खाता खाता पत्र्यावर होणारा माझा आवाज कानात साठव.

रात्री उबदार गोधडीत झोपी जा.

सकाळीच निघ.

माझे अश्रू अनावर होतील. तू त्यात मनसोक्त भिजून घे......

फ्रेश होशील.....

Comments

Nitin Nimbalkar said…
Chan re...

Mee Vadujcha.Balpan sagale mumbait gele.Pan engineering Sataryat K.B.P. la kele.Char varsha Agdi mansokt Satara anubhavala.

Pan maza gav ha maza week point ahe.

Tuza ''Paus kay Mhantoy?'' wachale ani gavachya bhurtya pavasachya aathavani tajya zalya.

Sadhya ithe hajarao mail dur Denmark madhlya eka office madhye basun Mazya Gavachya pavasat tu poorna bhijavalas.

Thanks Mitra.
Keep posting such nice stuff.

Popular posts from this blog

हिरा......

आनंद दिपोत्सवाचा...