बालपणीचा उन्हाळा...
सकाळी ऊन्हे डोळ्यावर येयीपर्यंत काढलेली झोप... विहिरीवर जाऊन मनसोक्त पोहण्याचा घेतलेला आनंद... पोहून येताना खाल्लेले पाडाचे आंबे... कडक ऊन्हात मार्केट यार्डवर क्रिकेट्च्या मॅचेस्... संध्याकाळी चौकातल्या मारुतीच्या कट्ट्यावर बसलेला अड्डा...पिच्चरचे प्लॅन्स... रात्री अंगणात ओळीने टाकलेली अंथरूणे...रंगलेल्या गप्पा...यात्रा... देवाला पोळ्यांचा नैवेद्य... छबिन्याच्या रात्री काढलेली सोंगे...पालखीवर उधळलेला गुलालाचा रंग... पहाटे तारवटल्या डोळ्यांनी पाहीलेला तमाशा... मामाकडून खाऊसाठी मिळालेले पैसे... त्यातून घेतलेली गारीगार,कलिंगडे,काकड्या... जत्रेत वाजवलेल्या पत्र्याच्या शिट्ट्या... दोन्ही काटे एकाच चावीने फिरणारी नकली घड्याळे... एकच काडी वरखाली करुन फोटो दाखवणारा कॅमेरा... पहिल्या ओळीत बसून पाहिलेला दुपारचा तमाशा... चार-चार विजारी घातलेल्या प्रधानाला आसुडाने फोडून काढणारा राजा... शिट्टी न येता सुद्धा तोंडात बोटे घालून केलेले फूफू... नमन,गवळण,वग.....कुस्तीचा फड... बत्ताशावर केलेली पहिली कुस्ती... मातीला पाठ टेकल्यावर डोळ्यात आलेले पाणी... मित्राने दिलेला धीर... पाहुण्यां...